मी माझे सर्वस्व तुला अर्पण करून निरोप घेईल
मुलांनो, मी माझी विनम्रता गिळंकृत केली आहे
मी माझी बनावट संपत्ती तुम्हाला वारस
ठेऊन जात आहे
मी विशेषज्ञ आहे
मी गांभीर्य पांघरून फिरत आहे
मला प्रत्येक भेटणारा माणूस मूर्ख वाटतो
मी ही मुर्खता तुला स्वाधीन करून जात आहे
मी तुला माझे भरजरी वस्त्र,
भाषा वैभव
आणि माझा अहंकार
तुला अर्पण करून निरोप घेईल
मी कचरा पेटीत फेकून दिली आहे
सारी सहजता आणि तरलता
मी गंभीर राहील त्या क्षणा पर्यंत
जो पर्यंत माझा सन्मान होत राहील
जरा कुठे माझ्या विरोधात सूर निघतील
तेव्हा पहा माझी मानसिकता, वाचिकता
आणि शारीरिक हिंसा
माझ्या आत हिंस्त्र पशु आहे व
बाहेर एक आदर्श पुरुष आहे,
माझ्या मुलांनो तुम्हाला
अर्पण करील माझा हा दुटप्पीपणा
मी छता वरून लाँच झालेले
रॉकेट आहे
का मोडक्या झोपडीतून
हवेत फेकलेला भाला आहे,
मी काय होतो या पेक्षा
जास्त महत्वाचे आहे की
मी काय झालो आहे,
जे काही असेल ते
अर्पण करून निरोप घेईल
गल्लीत बलात्कार असो, दंगल असो
मी तुला माझा शेळपटपणा अर्पण करून
शिकवून जाईल
कसे शेपूट घालून
दार खिडकी बंद करून घरात राहावे,
शेजारील घरात गरीब मुले भुकेने मरत आहेत
तू मात्र गिळत रहा पुरी भजे, सुका मेवा
मी तुला ही अव्वल निष्ठुरता
अर्पण करून निरोप घेईल
तुला पाऊले पाऊले दिसतील
अर्धनग्न मळकट पिचलेली
असंख्य बालके आणि बाया
तू त्याकडे दुर्लक्ष करीत
तुझी किमती बनारस साडी
आणि पॅन्ट सावरीत
अलगद निघून जा
मी तुला ही महान बेफिकीर
निर्लज्ज-परंपरा अर्पण करून निरोप घेईल
माझे साहित्य जगात वाचले जाते
अनेक भाषेत माझ्या पुस्तकांचा
अनुवाद झाला आहे
या अहंकाराच्या दुनियेत फुगून जाईल
आणि हीच हवा तुझ्या डोक्यात भरून
मी तुझा निरोप घेईल
माझे जे जे काही आहे
ते ते तुला अर्पण करून
तुमचा निरोप घेईल
मूळ हिंदी कविता-
~अनामिका अनु
मराठी अनुवाद- विजय नगरकर
********
मूल हिंदी कविता
मैं अपना सबकुछ तुम्हें दे कर जाऊँगा
बच्चों मैं पूरी विनम्रता खा चुका हूँ
मैं तुम्हें बनावटीपन विरासत में देकर जाऊँगा
मैं विशेषज्ञ हूँ
मैं गंभीर अहं को पहन कर निकलता हूँ
बेवकूफ़ लगता हैं मुझे हर दूसरा व्यक्ति
मैं यही बेवकूफ़ी तुम्हें देकर जाऊँगा
मैं अपने बढ़िया कपड़े,
भाषा पर पकड़
और अपनी अकड़ दे कर जाऊँगा
मैंने डस्टबीन में फेंक दी है सारी सहजता, सरलता
और तरलता
मैं तब तक ही गंभीर रहूँगा
जब तक मेरा सम्मान होगा ।
ज़रा सी ठेस पहुँचायी किसी ने
तब देखना मेरी मानसिक,वाचिक और शारीरिक हिंसा
मैं भीतर से पशु ,बाहर से सलीकेदार आदमी हूँ
मैं देकर जाऊँगा यह दोहरापन तुमको ,मेरे बच्चे!
मैं छत पर से लान्च हुआ रॉकेट हूँ
या टूटी झोपड़ी से फेंका भाला!
क्या था ,से ज़्यादा महत्वपूर्ण है
क्या बना मैं !
जो बना वह देकर जाऊंँगा
गली में रेप, लूट, दंगा होगा
खिड़की लगाकर दुबकना सीखा दूँगा
मैं तुम्हें अपनी पूरी कायरता दे कर जाऊँगा
बगल में मर जाएँगे भूखे बच्चे
तुम चबाते रहना पूरी भुजिया और सूखे मेवे
मैं तुम्हें वह अव्वल दर्जे की निष्ठुरता देकर जाऊँगा
नग्न, मैली, कुचली औरतें और बच्चे कई बार दिखेंगे-देखेंगे तुमको
तुम अनदेखा कर ठीक करना अपनी बनारसी और पतलून
मैं वह महान निर्लज्ज निष्फ़िक्र परंपरा तुमको देकर जाऊँगा ।
मैं दुनिया भर में पढ़ा जाता हूँ
कई भाषा में अनुवाद हुआ है मेरे कहे लिखे का,
इसी गुमान में जीवन भर फूला रहा हूँ मैं
और तुम में यही ग़ुबार भर कर जाऊँगा
मेरा जो कुछ भी है
तुम्हें देकर जाऊँगा!
~ अनामिका अनु
Anamika Anu
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें